शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण
महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
लातूर-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणी टंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्येशाने 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळयाच्या आकारमान निहाय पुढीलप्रमाणे अनुदान देय आहे असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
शेततळयाचे आकारमान 15 x 15 x 3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 28 हजार 275 रुपये ,शेततळयाचे आकारमान 20 x 15 x 3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 31 हजार 598 रुपये ,शेततळयाचे आकारमान 20 x 20 x 3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 41 हजार 218 रुपये ,शेततळयाचे आकारमान 25 x 20 x3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 49 हजार 671 रुपये ,शेततळयाचे आकारमान 25 x 25 x 3 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 58 हजार 700 रुपये , शेततळयाचे आकारमान 30 x 25 x 2 मीटरसाठी 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 67 हजार 728 रुपये ,शेततळयाचे आकारमान 30 x 30 x 3 मीटरसाठी50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम 75 हजार रुपये वैयक्तिक शेततळे या घटकासाठी आकारमाननिहाय देय अनुदान असणार आहे.
त्यानूसार महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. संगणक/लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचे आहे. त्याकरीता पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सातबारा, 8अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंब असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर कार्यालयातील तंत्र सहाय्यक- फलोत्पादन, विकास बालकुंदे संपर्क क्र.9823238338 व आपल्या तालूक्यातील तालूका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि, लातूर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा