राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह विविध संघटनांनी दिला मोटार सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद

 राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह विविध संघटनांनी

दिला मोटार सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद







लातूर- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, ग्रामसेवक व तलाठी अशा विविध संघटनेच्या वतीने जूनी पेन्शन योजना देशातील राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा आणि छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सामाजिक सुरक्षेसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना ( NPS ) रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना ( OPS ) सर्वांना लागू करणेच हिताचे आहे. त्यासाठी नोव्हेंबर,2005 नंतर सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भव्य मोठया प्रमाणात मोटार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली लातूरकरांनी उदंड प्रतिसाद देऊन 100 टक्के यशस्वी करुन दाखविली आहे. या रॅलीत मोठया प्रमाणात कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सांगता समारोपानंतर अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बी.बी.गायकवाड, सरचिटणीस संजय कलशेट्टी,कोषाध्यक्ष गोविंद लाडकर, उपाध्यक्ष आर.एस.तांदळे, संपर्क प्रमुख दिपक येवते, महसूल संघटनेचे अध्यक्ष माधव पांचाळ (महसूल संघटना), ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष अनंत सूर्यवंशी, तलाठी संघटनेचे अध्यक्ष महेश हिप्परगे,माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना गट क चे विभागीय अध्यक्ष अशोक माळगे, सचिव दिलीप वाठोरे,पोलीस कार्यालयीन संघटनेचे अध्यक्ष सूदेश परदेशी, भूमी अभिलेख संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रल्हाद लखनगीरे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे सचिव सचिन चव्हाण, तानाजी सोमवंशी, अरविंद पूलगूर्ले, संतोष क्षीरसागर,सिंचनचे निलरत्न बनसोडे आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती.राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेसह माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना गट-क,भूमि अभिलेख, सहकार,आरोग्य, सिंचन, पॉलिटेक्निक विभाग, मत्स्य व्यवसाय, अन्न व औषध प्रशासन, कृषी विभाग, मुद्रांक कार्यालय, आणि वस्तू व सेवा कर, आयटीआय, सांख्यीकी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन संघटना,शिक्षक संघटना, पोलीस कार्यालयीन संघटना तसेच विभागातील संघटनांनी सहभाग नोंदविला होता.सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रलंबित मागणीसाठी ही मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीची सुरुवात जुने प्रशासकीय इमारत कार्यालय, शिवाजी चौक मार्गे ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत होती. या रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आली.

यावेळी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष बी.बी.गायकवाड, संजय कलशेट्टी, दिपक येवते, माधव पांचाळ, महेश

हिपरग्गे, शेळके, श्रीमती सोनाली पाटील, अनंत सोमवंशी, काळे, तानाजी सोमवंशी, सचिन चव्हाण

आदिंची मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने