प्राथमिक शिक्षण घेताना लागलेली संगीताची गोडी,मंगेश करतोय संघर्षमय तडजोडी

             
प्राथमिक शिक्षण घेताना लागलेली संगीताची गोडी,

            मंगेश करतोय संघर्षमय तडजोडी


औसा- तालुक्यातील भादा येथील भूमिपुत्र मंगेश दिलीप कांबळे हा प्राथमिक शिक्षणामध्ये एका शिक्षकांनी लावलेली संगीताची गोडी आयुष्यासाठी जगण्याची करतोय संगीत क्षेत्रातील तडजोडी अशी एकूण परिस्थिती निर्माण करणारा भादेकर सच्चा भीमसैनिक मंगेश कांबळे यांनी आपल्या जीवनामध्ये संगीताची गोडी निर्माण केलेले एकंबी तांडा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी जीवनामध्ये औसा तालुक्यात सुविधा  किंवा गायनातील साहित्याची उणीव असताना बहारदार भीम गीतांनी प्रसिद्ध असणारी तत्कालीन "भीम भरारी गायन पार्टी भादा" टीम मधील भीम सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक महादेव व्हि उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणामध्ये त्यांनी निर्माण केलेली संगीताची गोडी मंगेशने आयुष्यामध्ये तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन पुढे  सुरू ठेवल्याने आज त्याचा दुसरा गाण्याचा अल्बम रिलीज झाला आहे.
        दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती ही हालाखीची आणि बेताचीच असतानाही आई वडिलांच्या साथीने आपली संगीत क्षेत्रातील गायनाची तीव्र इच्छा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवल्याने प्रथम मंगेश कांबळे याने प्रथम स्वतःच "माझ्या प्रेमाची किंमत कळल राणी तुला जीव माझा गेल्यावर"हे प्रसिद्ध गाने त्यांनी गायले होते आणि याला सर्व स्तरांमधून मोठी दाद मिळाली होती.
 यानंतर आता हा दुसरा गाण्याचा अल्बम नितीन जाधव यांनी लिहिलेल्या आणि आकाश साळवे यांनी संगीत बद्ध करून प्रकाशित केलेल्या संयोजक उमेश गवळी यांनी प्रकाशित केला असून "देवा श्री गणेशा" याही गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दाद मिळत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.यामुळे ग्रामीण भागातील कोणतीही संगीत क्षेत्रातील सेवा सुविधा नसतानाही हा उत्तम तऱ्हेने गायन करणारा गायक तोही योग्य वेळी मार्गदर्शन आणि घरातच गायनाचा वारसा असणारा आई संगीता कांबळे चा भिमगिताचा लहानपापासून चां वारसा आणि स्वतःच्यात मोठी उमेद जिद्द आणि लहानपणीच्या मार्गदर्शनाच्या शिदोरीवर तो आज येथे संगीत क्षेत्रातील यश शिखरावर आगदी कमी वयामध्ये पोहोचला असल्याची चर्चा लातूर जिल्हा आणि औसा तालुक्यात होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने