१०हजार कागदी पिशव्याचे औषधी दुकानदारांना वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन

१०हजार कागदी पिशव्याचे औषधी दुकानदारांना वाटप व रक्तदान शिबिराचे आयोजन




औसा प्रतिनिधी -श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर आणि लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव या  महाविद्यालयां मध्ये 25 सप्टेंबर  जागतिक औषधनिर्माण दिन म्हणून साजरा करण्यात आला. आणि भारतीय औषध परिषदेने सांगितल्याप्रमाणे   "निरोगी जगासाठी फार्मासिस्ट एकत्र "या विषयानुसार  अनेक उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवली आहेत . त्यामध्ये औषध निर्माण दिनाचे औचित्य साधून फार्मासिस्टचे समाजातील स्थान पटवून देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे सर्वसाधारण रोगाविषयी लक्षणे व त्यावरती उपाय याविषयी माहितीपत्रकाचे गावोगावी जाऊन वितरण करण्यात आले. व लोगो आणि घोषवाक्य या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याने १००पेक्षा जास्त सहभाग नोंदवला . तसेच माऊली ब्लड बँक लातूर ,यांच्या सौजन्याने  २०पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षकाने रक्तदान करून सहकार्य केले. त्याचप्रमाणे पथनाट्यतून रोगाविषयी जनजागृती केली आणि पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे, प्लास्टिक बंदी नियंत्रित येण्यासाठी महाविद्यालयातर्फे लातूर मधील  मेडिकल स्टोअरला  भेटी देऊन १० हजार कागदी पिशव्याचे वाटप केले व फार्मासिस्टना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार  करण्यात आले,   या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर आप्पा बावगे. सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला ,प्राचार्य डॉ. श्यामलीला जेवळे, संचालक श्री नंदकिशोर बावगे,  माधुरी बावगे, प्रा कदम सर , प्रा. कादर शेख,प्रा माधुरी पोलकर,प्रा निर्भय चलमले व रक्तदान शिबिराचे समन्वयक  प्रा. शुभम वैरागकर ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व विद्यार्थी ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी फार्मासिस्ट  सप्ताह चांगल्या पद्धतीने परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पार पाडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने