पुरणमल लाहोटी शासकीय पॉलिटेक्निक आणि महाऊर्जा एम्पानेल एनर्जी प्लानर व ऑडिटर केदार खमितकर यांच्याबरोबर सामंजस्य करार


पुरणमल लाहोटी शासकीय पॉलिटेक्निक आणि महाऊर्जा एम्पानेल एनर्जी प्लानर व ऑडिटर केदार खमितकर यांच्याबरोबर सामंजस्य करार

लातूर / प्रतिनिधी : दि १२ सप्टें पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन आणि महाऊर्जा एम्पानेल एनर्जी प्लानर व ऑडिटर केदार खमितकर यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. नैसर्गिक संसाधनांचे शास्वत व्यवस्थापन व संरक्षण करीत ऊर्जा ऑडिट क्षेत्रामधे सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि सहाय्य प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्राचार्य विशाल नितनवरे यांनी सांगितले. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन चे प्राचार्य विशाल नितनवरे, बीईई केंद्रीय विद्युत मंत्रालय प्रमाणित ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर , विभाग प्रमुख डॉ. के. आर. कदम, अभियंता किरण खमितकर, विद्युत विभाग प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी आदी मान्यवर मुख्य उपस्थित होते. दोन्ही समूहातील सदस्य यांच्याकडून शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम महाउर्जा महाराष्ट्र शासन यांची मार्गदर्शक तत्त्वे अनुसरून नियमितपणे अंमलबजावणी करतील असे केदार खमितकर यांनी विश्वास व्यक्त केला. सामंजस्य करार २०२२ ते २०२७ असा असणार आहे. सामंजस्य करार परस्पर हितसंबंध लक्षात घेत विद्युत, जल, उर्जा लेखापरीक्षण पर्यावरण व इंधन संवर्धन संरक्षण जनजागृती संयुक्त प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असून हा सामंजस्य करार आम्हाला ऊर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत पूर्ततेसाठी अधिक लक्षपूर्वक एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध करेल असे खमितकर म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने