महासोमयाग यज्ञाचे लातूरात आयोजन


महासोमयाग यज्ञाचे लातूरात आयोजन 


लातूर (वार्ताहार )लातूर शहरातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिर परिसरात दिनांक 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर२०२२ या कालावधीत महासोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे .
स्वानंद मंगल कार्यालयात या यज्ञाच्या तयारीची व्यापक बैठक घेण्यात आली.या बैठकीस शहरातील विविध क्षेत्रातील सुमारे १५०जण उपस्थित होते. विविध समित्यांचे गठन करण्यात आले .हा यज्ञ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीची रचना ही करण्यात आली. स्वामी समर्थ पिठावरील शेवटचे पीठाधीश परम सद्गुरु श्री गजानन महाराज शिवपूरी अक्कलकोट यांच्या आशिर्वादाने विश्व फाउंडेशन अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनानुसार यज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. 
संपूर्ण देशभरातून अनेक मान्यवर या यज्ञात सहभागी होणार आहेत .लातूर व परिसरातील जनतेने याचा लाभ घ्यावा व हा यज्ञ व्यापक करण्यासाठी सहभाग द्यावा असे आवाहन यज्ञ समितीचे अॅड संजय पांडे ,प्रेमकिशोर मुंदडा व उमेशराव जोशी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने