शिवलिंग नागापुरे यांचा जनकल्याण निवासी विद्यालय हरंगूळ यांनी केला सन्मान

शिवलिंग नागापुरे यांचा जनकल्याण निवासी विद्यालय हरंगूळ यांनी केला सन्मान


औसा प्रतिनिधी-
रा.स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र (प्रांत )संचलित जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु.) ता.जि. लातूर या सामाजिक ,शैक्षणिक प्रकल्पात ग्रामीण भागातील शेतकरी कुटंबातील अनेक विद्यार्थी,विद्यार्थीनी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. शिक्षण,संस्कार,समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर हा प्रकल्प कार्यान्वित असुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवून संस्कारक्षम,राष्ट्रभक्त सक्षम पिढी घडावी यासाठी प्रकल्पात शिक्षक विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले जाते.
   प्रकल्पात दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकल्पातील शिक्षक पर्यवेक्षकांसाठी कार्यप्रेरणा मिळावी,मार्गदर्शन मिळावे या हेतूने समाजातील उत्तम कार्य करणा-या शिक्षकाचा सन्मान केला जातो.या वर्षी  शिक्षकदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि 08 सप्टेंबर 2022 रोजी,  जनकल्याण निवासी विद्यालय हरंगूळ येथील कार्यक्रमात जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवलिंग नागापुरे यांचा  उत्कृष्ट आदर्श शिक्षक म्हणून सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रकल्पाचे अध्यक्ष प्रकाश लातूरे ,उपाध्यक्ष डॉ. लिलाताई कर्वा, सहकार्यवाह उमेशजी सेलूकर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकिय अधिकारी रविंद्जी पूर्णपात्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, भेटवस्तू  करण्यात आला.यावेळी वसतिगृह समिती अध्यक्ष अनंतराव पाठक, शालेय समिती सदस्य  अजय रेणापूरे, सतिश जाधव, वसतिगृह समिती सदस्य नरेंद्र पाठक, प्र.अधीक्षक दत्ताभाऊ माने, व्यवस्थापक  बाहूबली भस्मे ,सर्व सहकारी शिक्षक-पर्यवेक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.सत्कारमूर्ती शिवलिंग नागापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने