मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश देशमुख तर सचिवपदी बजरंग चोले यांची निवड

 मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश देशमुख तर सचिवपदी बजरंग चोले यांची निवड




लातूर : लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कार्यकारिणीसाठी रविवारी सरस्वती विद्यालयात बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदी प्रकाश देशमुख यांची तर सचिवपदी बजरंग चोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रमेश मदरशे, सचिन साबणे, उमेश पाटील, जयश्री ठवळे, सहसचिव दत्तात्रय पारवे, अनिल कारभारी, कोषाध्यक्ष शिवराज म्हेत्रे, सह कोषाध्यक्ष रामेश्वर कदम तर सदस्यपदी तानाजी मुंडे, एस.व्ही. मादलापुरे, परवेज अब्दुल समी पठाण, विशाल पात्रे, जयश्री पाटील तर प्रवक्तेपदी कालिदास शेळके यांचा समावेश आहे. दरम्यान, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांची विभागीय मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश टेकाळे यांनी काम पाहिले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिलीप धुमाळ, डी. के. कुलकर्णी, प्रेमचंद देवसाळे, अनंत सूर्यवंशी यांच्यासह अन्य मुख्याध्यापकांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने