दयानंद स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अमृतकुमार सिंग यांचे मार्गदर्शन

 दयानंद स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अमृतकुमार सिंग यांचे मार्गदर्शन

 
लातूर-दयानंद कला महाविद्यालयातील बी.ए.प्रशासकीय सेवा विभागातील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथील अमृतकुमार सिंग यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सिंग यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावेत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा, असे सांगून UPSC च्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. पुढे सिंग म्हणाले, ज्या सुविधा दिल्ली येथे आहेत, त्या सुविधा दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत आहेत. या संधीचा भरभरून फायदा घ्यावा, अभ्यास करताना दहा ग्रंथ एकेक वेळेस वाचण्यापेक्षा प्रत्येक विषयाचा एक ग्रंथ दहा वेळेस वाचावा, असा सल्ला सिंग यांनी दिला. तसेच सिंग व विद्यार्थी यांच्या प्रश्नोत्तराची चर्चा ही झाली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड यांनी कला शाखा ही सर्व शाखेची जननी असून स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर,डॉ.सुभाष कदम, क्रांती भारती यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. क्रार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकांक्षा विभुते यांनी मांडले. तर सूत्रसंचालन शुभम घोडके व कुमारी चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला बी.ए.प्रशासकीय सेवा विभागातील प्रा. उत्तम दुधभाते, प्रा.महेश मोरे, प्रा.गोविंद जाधव,प्रा.यशवंत जगताप, प्रा.भिंगोले, प्रा. अविनाश केजकर, प्रा.मनोज तावडे आणि विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने