जिपप्रा शाळा काळमाथा येथे शिक्षक दिन साजरा

जिपप्रा शाळा काळमाथा येथे शिक्षक दिन साजरा


औसा-शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमाथा येथे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या 
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमाथा येथे शिक्षक दिन साजरा*

      आज शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळमाथा येथे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक  दिनानिमित्त ग्रामस्तरावर श्री सोलनकर प्रताप व श्रीमती रंजना कणजे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दयानंद मोहिते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री.बालाजी मोहिते, हरिभाऊ पाटील, सोमनाथ मोहिते, मोहन पाटील,शिवाजी मुदाळे, उद्धव पाटील, संगप्पा कांबळे, बालाजी भोले,प्रेमनाथ भोंग, संपत गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, काशिनाथ मोहिते, गोविंद मोहिते, खंडू शेळके, विश्वनाथ आडसुळे, राघू कांबळे, राजाभाऊ भंगे, विलास भगाडे, सारिका पाटील, प्रेमला गिरी तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मोतेवाड, प्रास्ताविक मुख्याध्यापक नागनाथ माने तर आभार प्रदर्शन अशोक गायकवाड यांनी केले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी गुंगे, शरद बिराजदार, रमाकांत उदेवाल आणि श्रीमती आशा बिराजदार यांनी प्रयत्न केले.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने