महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग
प्रदेश सरचिटणीस पदी सौ. स्वाती जाधव पाटील यांची नियुक्ती.
लातूर- सौ स्वाती जाधव पाटील या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षापासून विविध पदावर कार्यरत राहून,पक्षाचे ध्येय, धोरणे व कार्य तळागाळा पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा.नाना भाऊ पटोले व राज्याचे माजी वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री. मा.अमित भैय्या देशमुख यांच्या शिफारशीवरून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेशअध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश रोजगार व स्वयंरोजगार विभाग प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली.महाराष्ट्र राज्याचे माजी वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री मा.आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रोजगार व स्वयंरोजगार शहर जिल्हाध्यक्ष सिकंदर पटेल ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकेश राजमाने दक्षिण शहर ब्लॉक अध्यक्ष संजय निलेगावकर शुभम जाधव पाटील उपस्थित होते.
निवडीबद्दल त्यांचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेल पटोले रोजगार व सह रोजगार प्रदेश कमिटीचे अध्यक्ष माननीय योगेश मसलगे पाटील राज्याचे माजी व वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री माननीय अमित भैया देशमुख साहेब सहकार महर्षी माजी मंत्री माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब माननीय लातूर ग्रामीण आमदार माननीय धीरज भैया देशमुख साहेब यांचे सौ.स्वाती जाधव पाटील यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा