शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्येवाचन प्रेरणा दिन उत्साहात


शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये
वाचन प्रेरणा दिन उत्साहात
लातूर : येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 यावेळी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष डॉ. एम. आर.पाटील यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांनी केले. यावेळी शिक्षक मानसी पाटील, सुषमा मुंडे, माधुरी पाटील, रेणुका समुद्रे, उषा गुडदे, अश्विनी पवार, अर्चना देशमुख, वर्षा कांबळे, शीतल नडगिरे, कांचन देवधर, माया ससाने, एकनाथ जाधव, सूरज गड्डिमे, ओम लवटे, प्रांजली पाटील, गीतांजली गिरी, अनघा पाटील यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने