राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी सरस्वती मातेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्याचा भाजपा युवा मोर्च्याकडून जाहीर निषेध

 राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी सरस्वती मातेबद्दल

केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्याचा भाजपा युवा मोर्च्याकडून जाहीर निषेध


लातूर-भाजपा युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील, माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉक्सीट कॉलेज अंबाजोगाई रोड येथे सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी शाळा महाविद्यालयातील सरस्वती मातेच्या प्रतिमेबद्दल केलेल्या वक्‍तव्याच्या विरोधात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत प्रचंड घोषणाबाजी करीत निषेध व्यक्‍त करण्यात आला.
भारतीय संस्कृतीमध्ये सरस्वती मातेला विद्येची देवता मानले जाते. स्वतः सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या काव्यामध्ये सरस्वती मातेचा उल्‍लेख करीत सरस्वतीचा हा दरबार खुला जाहला पाहू चला, शाळेमध्ये शिकूनी घेऊ ज्ञान मिळवू चला ग चला, असे म्हणत सरस्वती मातेचे अस्तित्व मान्य केलेलं आहे. पंरतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांनी मात्र, सरस्वती मातेबद्दल वादग्रस्त वक्‍तव्य करून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे भाजपा युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्‍त केला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, भारतीय जनता युवा मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, राहूल भूतडा,  लक्ष्मण मोरे, विद्यार्थी आघाडीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश पवार, नवनियुक्‍त विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष शुभम माळवदे, आदित्य माने, विद्यार्थी आघाडी चिटणीस पवन झेटे, भाजपा युवा मोर्चा पुण्यश्‍लोक आदिल्यादेवी होळकर मंडळाध्यक्ष काका चौगुले, श्री.सिध्देश्‍वर मंडळाध्यक्ष रवीशंकर लवटे, मंदार कुलकर्णी, संतोष तिवारी, चैतन्य फिस्के, यशवंत कदम, अजय रेड्डी, महादेव पिटले, ईश्‍वर सातपुते, ईश्‍वर कांबळे, ऋषिकेश क्षिरसागर, तन्मय पवार, अभिषेक यादव यांच्यासह तूषार बदनाळे, अमर पाटील, मंगेश लादे, कृष्णा चव्हाण, अजय पारीख, किरण पाटील, शिवशंकर माळी, श्रीकांत बेदकुंदे, रोहन कदम, सुरज गोसावी, अथर्व देशमुख, निखील वळसने, महेश मलशेट्टे, विशाल घार, मयुर दराडे, ओमकार गुमटे, विष्णू जाधव, पंकज जाधव, पार्थ पाटील, वैभव पाटील, विशाल माने, कृष्णा आगवाने, अमर पवार, सूदर्शन मलेशे, कृष्णा काकडे, यश देशमुख, रवी लामतूरे, शुभम स्वामी, पार्थ जोशी, निखील शेळके, प्रताप पवार, शाम फावडे, आकाश चट,  सूदर्शन सरनार यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने