माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार पी.एस. काळे यांच्या 'काजवा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
लातूर ( प्रतिनिधी ) : पुणे महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले पी.एस.काळे यांच्या 'काजवा' या आत्मचरित्राचे तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. लातूरच्या ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुल मध्ये गुरुवार, दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी हा प्रकाशन समारंभ पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वैजनाथ शिंदे तर प्रमुख पाहून म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती राहणार आहे. तर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची उपस्थिती राहणार आहे.
शिक्षणाधिकारी पी.एस. काळे यांनी लातूर जिल्ह्यातही सेवा बजावली आहे. ते पंचायत समिती लातूर इथे वर्ष २००० ते २००७ या काळात गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच ते लातूर जिल्हा परिषदेचे प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणूनही काही काळ काम पाहिलं आहे. सध्या ते पुणे महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावित आहेत. ते शासकीय सेवेत रुजू होईपर्यंत तसेच त्यानंतरही त्यांचे जीवन हे संघर्षमय राहिलं आहे. त्यामुळे आपल्या संघर्षमय जीवनावर 'काजवा' या शीर्षकाखाली आत्मचरित्र लिहिलं आहे.
पी.एस. काळे यांचे लातूरवर आजही प्रेम असल्यामुळे या आत्मचरित्राचे प्रकाशन लातूरमध्ये व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे लातूरच्या ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलचे चेअरमन रमेश बिरादार आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाच्यावतीने या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे.
हा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. २० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुल, लातूर या ठिकाणी प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन रमेश बिरादार, तुकाराम पाटील, बाबुराव जाधव, राम बोरगावकर, निलेश राजेमाने, विवेक सौताडेकर, प्रकाश देशमुख, संभाजी नवघरे, सच्चीदानंद ढगे, शशिकांत पाटील, संतोष बिराजदार, विवेकानंद ढगे, डॉ. शशिकिरण भिकाने, ईस्माईल शेख, असिफ शेख यांच्यासह मित्रमंडळाने केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा