माजी मंत्री घोलप यांचा वाढदिवस मातोश्री वृध्दाश्रमात साजरा


माजी मंत्री घोलप यांचा वाढदिवस मातोश्री वृध्दाश्रमात  साजरा

लातूर- राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांचा ६८ वाा वाढदिवस सोमवार,दि.१० ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हा शाखा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने येथील मातोश्री वृध्दाश्रमात आजी- आजोबांच्या सानिध्यात स्नेहभोजनाने साजरा करुन अभिष्टचिंतन करण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.के.मुरळीकर व मराठवाडा उपाध्यक्ष इंजि.एन.डी.शिंदे यंाच्या हस्ते महासंघ संस्थापक अध्यक्ष  बबनराव यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन केक कापून उपस्थित पदाधिकार्‍यांनी उत्सा हात अभिष्टचिंतन केले.वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक व सर्व आजी-आजोबांचे यावेळी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.के.मुरळीकर यांनी बबनराव घोलप व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कार्याची माहिती दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवी कुरील यांनी केले.  याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्रा.लक्ष्मीकांत खरटमोल,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कबाडे,औसा तालुका कार्याध्यक्ष कांबळे,रेणापूर तालुका अध्यक्ष बापू सातपुते, माजी महिला जिल्हाध्यक्षा वैशाली अनिल कबाडे तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य सुनील ढवळे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने