शेतकर्‍यांचा विश्वास हिच कारखान्याची पत-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

 शेतकर्‍यांचा विश्वास हिच कारखान्याची पत-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर



निलंगा/प्रतिनिधी ः- उद्योग आणि व्यवसाय वाढविण्यासाठी ग्राहकांमध्ये पत वाढविण्यासह त्यांचा विश्वास संपादन करणेही तितकेच आवश्यक असते. साखर कारखान्यासाठी शेतकरी हा ग्राहक राजा असून त्यांचा विश्वास हिच कारख्यान्याची पत राहणार असून यासाठी शेतकर्‍यांनी आर्शिवाद द्यावा असे आवाहन करून शेतकर्‍यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी ओंकार साखर कारखाना प्रा.लि. यांनी घेतला आहे. या कारखान्याच्या गाळप हंगाम 2022-23 साठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विजयादशमीच्या मुहूर्तावर रोलर पुजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, डॉ. समीधाताई पाटील निलंगेकर, माजी जि.प. अध्यक्ष मिलींद लातूरे, संघटन सरचिटणीस संजय दोरेवे, अ‍ॅड. संभाजीराव पाटील, खादी ग्राम उद्योगचे चेअरमन दगडू साळूंके, कारखान्याचे कार्यकारी संचालक उमाकांत कांदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकर्‍यांच्या दृष्टींने अतिशय महत्वाचा असणारा निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना गेल्या कांही वर्षापासून बंद होता. हा कारखाना चालू करण्यात यावा अशी मागणी सातत्याने शेतकर्‍यांतून होत होती. कारखाना चालू करण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेऊन ओंकार साखर कारखाना प्रा.लि. च्या माध्यमातून सुरु केलेला आहे. कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील व त्यांच्या सहकार्यांनी गेल्या काही दिवसापासून प्रचंड मेहनत घेत कारखाना लवकरात लवकर चालू करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगत आ. निलंगेकर यांनी आता विजयादशमीच्या मुहूर्तावर गाळप हंगाम सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे रोलर पुजन करण्यात येत असल्याचे सांगितले. कारखाना हा कोणत्याही पक्षाचा नसून केवळ शेतकर्‍यांचा राहणार असल्याची ग्वाही देऊन शेतकर्‍यांचे हित सर्वतोपरी जोपासण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
कोणताही व्यवसाय अथवा उद्योग मोठा होण्यासाठी ग्राहकांचा आर्शिवाद आणि त्यांचा विश्वास अंत्यत महत्वाचे असल्याचे सांगत यामुळे निश्चितच पत सुद्धा वाढण्यास मोठी मदत होते असे सांगून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी शेतकर्‍यांचा विश्वास हिच कारखान्याची पत राहणार असल्याचे स्पष्ट केले. कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल होऊन तो उत्तमरित्या चालविण्यासाठी शेतकर्‍यांचे पाठबळ आणि त्यांचा आर्शिवाद महत्वाचा आहे. कारखाना यशस्वीपणे चालविण्यासाठी भिऊ नका आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असा आर्शिवाद शेतकर्‍यांनी द्यावा असे आवाहन करून शेतकर्‍यांच्या विश्वासाला कोणत्याही परिस्थितीत तडा जाऊ देणार नाही असा विश्वास माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला. शेतकर्‍यांच्या आर्शिवादाच्या बळावर आगामी वर्षात कारखाना प्रशासनाच्या वतीने आसवानी प्रकल्पही सुरु करण्यात येईल अशी ग्वाही माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली. यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष शाहुराज थेटे, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, निलंगा शहराध्यक्ष अ‍ॅड. विरभद्र स्वामी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प्रदेश कार्यकारीणी सदस्या जयश्री पाटील, ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील, माजी जि.प. सदस्य प्रशांत पाटील, संतोष वाघमारे, मधुकर माकणीकर, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, डॉ. लालासाहेब देशमुख, माजी सभापती शंकरराव पाटील, कारखाना प्रशासनाचे केशव अंकुशकर, सचिनकुमार देशमुख, देवेंद्र बालकुंदे, रावसाहेब देशमुख आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी  व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने