संगमेश्वर प्राथमिक विद्यामंदिरातदांडिया रास कार्यक्रम उत्साहात

संगमेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात
दांडिया रास कार्यक्रम उत्साहात




लातूर : येथील अंबाजोगाई रोडवरील संगमेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डी. एन. केंद्रे हे उपस्थित होते तर या प्रसंगी संस्थेचे सहसचिव राजेंद्र जायेभाये, मुख्याध्यापक अविनाश पवार, प्रा. कविता केंद्रे, सोनिया जायेभाये, अमित जायेभाये, शिवकांत वाडीकर, शिक्षक जी. बी. मोरे, डी. पी. दिवटे, डी. एस. भदभदे, जे. जी. कावळे, आर. व्ही. डुकरे, एन. आर. मुंडे, ए. व्ही. माने, अनिल वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्ज्वलन व सरस्वती स्त्रोताने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विज्ञान प्रदर्शनासह विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोरिओग्राफर व्ही. एस. गंदगोने, ए. एस. जोशी, के. ए. पारडे, एस. ए. वानखेडे व त्यांच्या चमुने परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने