दिवाळीत प्रवाश्यांच्या सुविधेसाठी हडपसर-लातूर-नांदेड रेल्वेगाडी -खा.सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश

     दिवाळीत प्रवाश्यांच्या सुविधेसाठी हडपसर-लातूर-नांदेड रेल्वेगाडी -खा.सुधाकर शृंगारे  यांच्या पाठपुराव्याला यश 
लातूर (प्रतिनिधी )-दिवाळीच्या निमित्ताने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी हडपसर-लातूर-नांदेड हि नवीन विशेष  रेल्वे गाडी सुरुवात करण्यात आली आहे . पुणे येथून लातूर-नांदेडकडे येणाऱ्या प्रवाश्यांची मोठी गर्दी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे  यांनी रेल्वे विभागाकडे विशेष रेल्वेगाडी सोडण्याची मागणी केली होती . आता हडपसर-लातूर-नांदेड आणि नांदेड-लातूर-हडपसर हि रेल्वेगाडी सोडण्यात आल्याने खासदार सुधाकर शृंगारे  यांच्या मागणीला यश मिळाले आहे . पुणे येथे झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीतही या रेल्वेगाड्या सुरूवात करण्याची मागणी खासदार सुधाकर शृंगारे  यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केलेली होती . 
---२४ ऑक्टोबर रोजी दुपारी ११.५० वाजता हि रेल्वेगाडी हडपसर स्टेशनवरून लातूर-नांदेडसाठी सुटणार आहे . हडपसर -दौड ,कुर्डुवाडी ,उस्मानाबाद ,येथे थांबत हि रेल्वेगाडी सायंकाळी ५.०० वाजता लातूर स्टेशनवर पोहचेल . तर  दुसरी रेल्वेगाडी २४ ऑक्टोबर रोजी नांदेडहून ३ वाजून ५० मिनिटांनी लातूरला पोहचेल  आणि ३ वाजून ५५ मिनिटांनी हडपसरकडे रवाना होईल .  हडपसर येथे सकाळी  १०.४५ वाजता पोहंचनार आहे . या  दोन्ही गाड्यांचा क्रमांक वेगवेगळा आहे . तर नांदेड-लातूर-हडपसर (पुणे ) हि तिसरी विशेष गाडीही सुरुवात करण्यात आली आहे . २७ ऑक्टोबर रोजी नांदेड-लातूर-हडपसर हि रेल्वेगाडी ०७४०९ हि गाडी नांदेड येथून २०. ५० वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी हडपसर येथे सकाळी ९. ०० वाजता पोहचेल . २७ ऑक्टोबर रोजी हडपसर-लातूर-नांदेड हि ०७४१० हि रेल्वेगाडी दुपारी-१५.३० वाजता सुटेल दुसऱ्या दिवशी लातूर मार्गे नांदेडला सकाळी -४.०० वाजता पोहचेल. पुणे येथून लातूरकडे येणाऱ्या प्रवाश्यानी हडपसर पर्यंत लोकलने येऊन तेथून लातूर-नांदेडकडे जाण्यासाठी हि रेल्वेगाडी उपलब्ध असेल . या रेल्वे प्रवासाचा प्रवाश्यानी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे  यांच्या वतीने करण्यात आले आहे . 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने