आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास विविध ग्रामपंचायती, सोसायटी व संघटनांचा पाठिंबा – खा. ओमराजे निंबाळकर

 आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणास विविध ग्रामपंचायती, सोसायटी व संघटनांचा पाठिंबा – खा. ओमराजे निंबाळकर


          धाराशिव-   सोमवार दि. 24 ऑक्टोंबर 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या पुर्ण व्हाव्यात याकरीता मा. आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांचे उपोषण चालू असून उपोषणातील प्रमुख मागण्या 1. मासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पीक विम्याची 531 कोटी रुजिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी. 2. 531 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्याबाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रक्कमेत कोणतीही छुपी कपात करु नये. 3. सन 2021 च्या पीकविम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी  रुपयांची रक्कम ही विमा पात्र 6 लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे. 4. सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी, ढगफुटी, रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 248 कोटी रुपये 2 लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत. 5. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आज पर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे 1200 कोटी रु. तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या उपोषणातील प्रमुख मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही या मगाणीवर मा. आ. कैलास पाटील ठाम आहेत.    

            शेतकऱ्यांच्या वरील महत्वाच्या मागण्या पुर्ण होण्यासाठी विविध स्तरावरुन उपोषणास पाठिंबा मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील एकुण 105 ग्रामपंचायतींनी उपोषणास पाठिंबा दिला असून अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती, ऑल इंडिया पँथर सेना ग्रामीण, सिवील राईट्स संघटना धाराशिव, लहुजी शक्ती सेनाराघुचीवाडी, स्वराज इंडीया महाराष्ट्र, रा.स.प. जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना महाराष्ट्र वाहतुक सेना महासंघ, टायगर सोशल ग्रुपधाराशिव, भवानी ग्रुपधाराशिव, जय जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थावाखरवाडी, भारतीय मराठा महासंघ, किसान शेती साधन पुरवठा सहकारी संस्थाधाराशिव शहर काँग्रेस समिती, संभाजी ब्रिगेडधाराशिव, बळीराजा शेतकरी स्वायत्त बचत गटमंगरुळ, भिम आण्णा सामाजिक संघटनामहाराष्ट्र राज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनामोहोळ जि. सोलापूर, गोंधळी समाज सेवा संघ, 9 सोसायटी तसेच आम आदमी पार्टी, धाराशिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सांस्कृतिक विभाग), धाराशिव व काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये हजारो शिवसैनिक, शेतकरी दररोज येवून भेटून जात आहेत. त्यामुळे सरकारने व जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेवून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची भरपाई तात्काळ जमा करावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने