वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याखानाचे आयोजन

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याखानाचे आयोजन
लातूर- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रीतीने जतन करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार होणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर, मराठवाडा साहित्य परिषद व वेद प्रतिष्ठान सार्वजनिक ग्रंथालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे  माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी  दिनांक: 15 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रंथ प्रदर्शन व व्याखानाचे आयोजन वेद प्रतिष्ठान सार्वजनिक ग्रंथालय, टिळक नगर पोस्ट ऑफिस जवळ, खोरी गल्ली, लातूर येथे करण्यात करण्यात आलेले आहे. ग्रंथ प्रदर्शनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्यावरती लिहिलेले ग्रंथ तसेच हैद्राबाद मुक्तिसंग्राम वरील विविध ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटण जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष ४२ वे मराठवाडा साहित्य सम्मेलन, घनसांगवी डॉ. शेषराव मोहिते हे आहेत. तरी सदर कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने