दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येणार


दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येणार

लातूर- राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त अन्नधान्याच्या व्यतीरिक्त प्रत्येकी १ किलो रवा, १ किलो चनादाळ, १ किलो साखर व १ किलो लिटर पामतेल या ४ जिन्नसांचा समावेश असलेल्या शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देणेबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन परिपत्रक दि. ०४ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार लातूर तालुक्यात २४८ रास्त भाव दुकाने असून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व एपीएल शेतकरी असे एकुण १ लाख ३३१ लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने यांचे मार्गदर्शनाखाली व तहसीलदार स्वप्नील पवार यांनी १ किलो रवा, १ किलो चनादाळ, १ किलो साखर व १ किलो लिटर पामतेल या ४ जिन्नसांचा समावेश असलेले संच दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना वितरीत करण्यांत येत असल्याचे सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने