“विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करताना काळजी घ्यावी”
भारत सरकार शिष्यवृत्ती लातूर विभाग प्रमुख डी.बी.माने
लातूर _महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपला शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नोंदविताना योग्य काळजी घ्यावी असे प्रतिपादन भारत सरकार शिष्यवृत्ती लातूर विभागाचे विभाग प्रमुख डी.बी.माने यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या व्होकेशनल सभागृहामध्ये महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी कार्यशाळा संपन्न झाली यामध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, वरिष्ठ लिपिक एस.व्ही. भोसले, तालुका समन्वयक ए.व्ही.मुळे, जी.एम.जोगदंडकर, शिष्यवृत्ती समिती समन्वयक तथा स्टाफ सचिव कॅप्टन डॉ.बी.एम.गोडबोले, प्रा.रवींद्र सुरवसे, डॉ.संजय गवई आणि प्रा.श्रीकांत माळी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना डी.बी.माने म्हणाले की, भारत सरकार मार्फत समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक विकासासोबत व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा केला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी तालुका समन्वयक ए.व्ही.मुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडून घ्यावा, आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याशी लिंक करून घ्यावे. यानंतरच शिष्यवृत्तीचा फॉर्म दिलेल्या तारखेपर्यंतच भरला पाहिजे आणि आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल क्रमांक शैक्षणिक जीवन संपेपर्यंत आपण तो बदलू नये असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील लिपिक यशपाल ढोरमारे यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना केलेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.किसनाथ कुडके, प्रा.शिवशरण हावळे, प्रा.आशिष क्षिरसागर, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदर्गे, लिपिक यशपाल ढोरमारे, सय्यद जलील आणि बालाजी डावकरे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा