खुंटेफळ येथे पीक कापणी प्रयोग जिल्हाधिकारी उपस्थित
लातूर : खुंटेफळ (ता. लातूर) येथे आज झालेल्या सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगाला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी उपस्थिती लावली. महसूल विभागाने या पीक कापणी प्रयोगाचे आयोजन केले होते.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपविभागीय कृषि अधिकारी महेश क्षीरसागर, प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, सहायक गटविकास अधिकारी के. आर. कोळपे, तंत्र अधिकारी नितीन कांबळे, तालुका कृषि अधिकारी यशवंत दहिफळे यांच्यासह महसूल, कृषि व ग्रामविकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महसूल मंडळातील पिकनिहाय उंबरठा उत्पन्न ठरविण्यासाठी महसूल, जिल्हा परिषद व कृषि या तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून पीक कापणी प्रयोग आयोजित केले जातात. विविध पिकांचे पीक कापणी प्रयोग हे ग्रामस्तरीय समितीच्या उपस्थितीत होतात. चिंचोली महसूल मंडळातील खुंटेफळ येथील शेतकरी रमेश पांढरे यांच्या शेतात आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
कृषि पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे, मंडळ कृषि अधिकारी आर.आर. गायकवाड, मंडळ अधिकारी त्र्यंबक चव्हाण, अनिल सूर्यवंशी, कृषि पर्यवेक्षक योगेश मूळजे, पीक विमा कंपनी प्रतिनिधी परमेश्वर पवार, कृषि सहाय्यक विरनाथ सूर्यवंशी, तलाठी सत्यनारायण आचार्य, ग्रामसेवक श्रीकांत मुंडे, ग्रामस्तरीय समिती उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा