एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ऊर्जा संवर्धनासाठी सामंजस्य करार



एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ऊर्जा संवर्धनासाठी सामंजस्य करार

लातूर / प्रतिनिधी पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धन क्षेत्रात सहकार्य विकसित करण्यासाठी एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महाऊर्जा एनर्जी ऑडिटर केदार खमितकर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य करारावर प्रभारी प्राचार्य प्रा.बी.व्ही. धरणे आणि ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी झालेल्या सामंजस्य करारात  (MOU) स्वाक्षऱ्या केल्या. या सामंजस्य करारामुळे, ऊर्जा लेखापरीक्षण आणि व्यवस्थापन क्षमता बळकट होऊन पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात समानता , ऐतिहासिक वारसा क्षेत्रांचे संवर्धन करणे, परस्पर आणि उभयपक्षी लाभ होईल अशा  प्रकारचे  द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत होईल आणि त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल असे प्रभारी प्राचार्य प्रा. धरणे यांनी सांगितले. बीईई केंद्रीय विद्युत मंत्रालय प्रमाणित ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर, प्रभारी प्राचार्य प्रा.बी.व्ही. धरणे, विद्युत विभाग प्रमुख प्रा.चिन्मय पटनाईक, अभियंता किरण खमितकर, प्रा.राहुल व्यवहारे, रवी देशमुख आदी मान्यवर सामंजस्य ज्ञापन कार्यक्रमात उपस्थित होते. दोन्ही समूहातील सदस्य यांच्याकडून शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम महाउर्जा महाराष्ट्र शासन यांची मार्गदर्शक तत्त्वे अनुसरून नियमितपणे अंमलबजावणी करतील असे केदार खमितकर यांनी विश्वास व्यक्त केला. सामंजस्य करार २०२२ ते २०२७ असा असणार आहे. सामंजस्य करार परस्पर हितसंबंध लक्षात घेत विद्युत, जल, उर्जा लेखापरीक्षण प्रशिक्षण संयुक्त प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट असून हा सामंजस्य करार आम्हाला ऊर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत पूर्ततेसाठी अधिक लक्षपूर्वक एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध करेल असे केदार खमितकर म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने