रामनाथ विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा







 रामनाथ विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा


आलमला :- श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे विद्यालयाच्या प्रांगणात संविधान दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शरण धाराशिवे  यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संविधानाचे वाचन कु. आलमले भूमी या विद्यार्थिनींनी केले. त्यानंतर संविधान दिनाविषयी कोकाटे ओमकार या विद्यार्थ्याने आपले मनोगत मांडले. शेवटी विद्यालयाचे पर्यवेक्षक पाटील पी.सी.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत त्यांचे पुस्तकावर असलेले अतोनात प्रेम आपल्या भाषेत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर सूर्यवंशी यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने