हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे ( जेवळे ) यांना "राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार"

हासेगाव लातूर कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे ( जेवळे ) यांना "राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार"





औसा (प्रतिनिधी ) ११ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन ( SPER 2022 ) आयोजित“ नॅशनल एज्युकेशन  एक्सलन्स अवॉर्डस ”  मध्ये   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत   लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविदयालयाच्या  प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे ( जेवळे ) यांना "राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२१" (National Education Excellence Award 2021) नॅशनल सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांचे तर्फे देण्यात आला या प्रसंगी  ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स भोपाल व जम्मू चे अध्यक्ष व ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली चे माजी संचालक डॉ. वाय . के . गुप्ता यांचे हस्ते देण्यात आला या वेळी राजस्थान सरकारचे ड्रग्स कंट्रोलर डॉ. अजय पाठक, नॅशनल सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे उपाध्यक्ष प्रो.डॉ. ए. के. गोष व आय एस एफ कॉलेज ऑफ फार्मसी, मोगा या महाविद्यालयाचे संचालक प्रो. डॉ. जी. डी. गुप्ता तसेच श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्री नंदकिशोर बावगे उपस्थित होते.
    त्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  संचालक नंदकिशोर बावगे , , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज   , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी यांनी प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे ( जेवळे) यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

أحدث أقدم