रामनाथ विद्यालयाचे ज्युदो स्पर्धेत जिल्ह्यात दहा विद्यार्थी प्रथम

रामनाथ विद्यालयाचे ज्युदो  स्पर्धेत जिल्ह्यात दहा विद्यार्थी प्रथम








आलमला (प्रतिनिधी) येथील श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता. औसा या विद्यालयाने लातूर येथील क्रीडा संकुल प्रांगणामध्ये झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत घवघवीत यश मिळवून जिल्ह्यातून वेगवेगळ्या वजन गटात व वयोगटात दहा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये कु. राठोड गीता, कदम समृद्धी,  पवार वैष्णवी, चव्हाण काजल,  आडे ममता, कदम साक्षी, पवार पूजा,  लोणारे सुमित,  बोकडे साधू या विद्यार्थ्यांनी बाजी मारून विभागीय स्पर्धा नांदेड येथे आपले स्थान निश्चित केले आहे. तर द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यालयातील विद्यार्थी कु. आडे ऋतुजा, इनामदार आयेशा, उमर सय्यद, व्हनाळे महेश,  कुंभार पृथ्वीराज,  व्हनाळे धोंडीराम,  जाधव वैष्णवी, चित्ते अंकिता या विद्यार्थ्यांनी ज्युदो  स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे, वरील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक एल.पी. बिराजदार व रंगनाथ आंबुलगे यांचे संस्थेच्या वतीने व मुख्याध्यापिका सौ.पाटील अनिता, पर्यवेक्षक श्री पाटील पी.सी.,  प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे ग्रामीण भागातील ज्युदो स्पर्धेत घवघवीत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने