लातूर येथे प्रोफेशनल ब्युटिशियन कोर्सच्या आयोजन

लातूर येथे प्रोफेशनल ब्युटिशियन कोर्सच्या आयोजन


लातूर (प्रतिनिधी)-लातूर शहर आणि जिल्ह्यातील महिला आणि मुली यांच्या करिता राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी आणि दीपशिखा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास अभियानाचा एक भाग म्हणून महिला मुली यांच्या करिता प्रोफेशनल ब्युटिशियन कोर्स चे आयोजन लातूर या ठिकाणी केले आहे की ज्यामुळे शाळा कॉलेज संपल्यानंतर महिलांनी मुली यांना व्यावसायिक पदार्पण करता यावा याकरिता या प्रोफेशनल ब्युटिशियन कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रबोधिनीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक शिवाजीराव पवार आणि दीपशिखाच्या विभागीय अधिकारी नीता मगर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
ग्रामीण भागातल्या मुली आणि महिला यांना शिक्षणानंतर स्वतःला व्यावसायिक कौशल्य विकसित करावी आणि ब्युटी क्षेत्रामध्ये असलेल्या विविध संधींची माहिती व्हावी याकरिता या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये महिलांना दीड महिने पूर्ण वेळ प्रशिक्षण कार्यक्रम थेअरी आणि प्रात्यक्षिकांवर आधारित दिला जाणार आहे. यामध्ये थ्रडिंग फेशियल, वॅक्स, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, हेअर स्टाईल, हेअर कट स्किन ट्रीटमेंट पर्सनल मेकअप यासह अनेक गोष्टींवर तज्ञ प्रशिक्षिका द्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे ,तसेच पार्लर व्यवस्थापन मार्केटिंग यशस्वी उद्योजकांच्या अनुभव विविध शासकीय निमशासकीय कर्ज आणि अनुदानाचे योजना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली जाणार आहे तसेच पार्लर उभारणी करिता मदत आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.हा प्रोफेशनल ब्युटिशियनचा कोर्स 16 नोव्हेंबर २२ ते 31 डिसेंबर 22 या कालावधीमध्ये जे एस ब्युटी पार्लर,कोरे गार्डनच्या शेजारी, मोती नगर,संभाजी चौक, लातूर या ठिकाणी दररोज दुपारी बारा वाजता होणार आहे. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी जयश्री शिंदे मो.8923395888 आणि कमलाकर सावंत मो.9404566610 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने