राष्ट्रीय शिक्षण दिनानिमीत्त सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक जनजागृती

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमीत्त सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक जनजागृती

लातूर- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण अभियानांतर्गत राष्ट्रीय शिक्षण दिनी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी झालेल्या कायदेविषयक जनजागृती शिबिरात अ‍ॅड. सुमेधा शिंदे, अ‍ॅड. अंजली जोशी, विधी स्वयंसेविका पार्वती सोमवंशी, शेख ईस्माइल, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अ‍ॅड. शिंदे यांनी बालकांचे अधिकार, बालकांचे संरक्षण, सक्तीचे शिक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. जोशी यांनी मुलभूत अधिकार, तसेच विधी स्वंयसेवक सोमवंशी यांनी शिक्षणाचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागात कायदेविषयक मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत खंडापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर झाले. अ‍ॅड. सुचिता कोंपले, अ‍ॅड. शैलेश आयनिले, अ‍ॅड. अरुणा वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते. अ‍ॅड. वाघमारे यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व वैकल्पिक वाद निवारण पध्दतीविषयी  मार्गदर्शन केले. तसेच अ‍ॅड. कोंपले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, मध्यस्थी, लोकन्यायालयबाबत, तर अ‍ॅड. आयनिले यांनी बालकांचे अधिकार, सक्तीचे शिक्षण, रॅगींग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याविषयी माहिती दिली. यावेळी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खंडापूर, खोपेगाव, धनेगाव, सारोळा, कातपूर, धानोरी, शिराळा, बोरगाव बु., पेठ, काशीरामलिंगेश्वर या गावांमध्ये शिबीर घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने