शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

 

औरंगाबाद- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तसेच महसुल मंडळाच्या ठिकाणी नमुना 5 मध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे.प्रसिद्ध करण्यात आलेली यादी  विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसिल कार्यालय या ठिकाणी अवलोकनासाठी उपलब्ध असणार आहे.  औरंगाबाद विभागाची एकत्रित प्रारूप मतदार यादी www.ceo.maharashtra.gov.in  व www.aurangabad.gov.in  या संकेतस्थळावरदेखील पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.23 नोव्हेंबर रोजी प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यानंतर दावे व हरकती 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 पर्यंत पदनिर्देशित ठिकाणी संबंधित तहसिल कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी स्वीकारण्यात येथील प्रारूप यादीच्या अनुषंगाने सुधारणा, वगळणे समावेशना बाबत विहित नमूना पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या मतदार प्रारूप यादी मध्ये आपल्या नावाच्या समावेशनाची खात्री करावी व प्रसिध्दीनंतर नमुद कालावधीत यांचे दावे व हरकती दाखल करावेत असे आवाहन  विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ यांनी  केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने