शारदा सेमी स्कूलमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी


शारदा सेमी स्कूलमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

 लातूर-  येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंचा नेहरू शर्ट परिधान केला होता. विद्यार्थ्यांनी नेहरूंविषयी भाषणे केली. वर्षा कांबळे यांच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शाळेचे शिक्षक मानसी पाटील, सुषमा मुंडे, अनघा पाटील, अश्‍विनी पवार, रेणुका समुद्रे, वर्षा कांबळे, कांचन देवधर, गीतांजली गिरी, माधुरी पाटील, उषा गुडदे, प्रियल गोखले, ऐश्‍वर्या बागल, शीतल नडगिरे, दर्शना देशमुख, एकनाथ जाधव, प्रांजली पाटील, ओम लवटे, सूरज गड्डिमे, रोहित जाधव यांसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने