महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

लातूर -येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई आणि विभागीय शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण), नांदेड विभाग, नांदेड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे दि.१९ ते २५ नोव्हेंबर २०२२  या कालावधीमध्ये कौमी एकता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.  
उद्या दि.१९ नोव्हेंबरला राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त धर्मनिरपेक्षता जातीवादी विरोध व अहिंसा यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दि.२० नोव्हेंबरला अल्पसंख्यांक कल्याण दिवस, सोमवार दि.२१ नोव्हेंबरला भाषिक सुसंवाद दिवस, मंगळवार दि.२२ नोव्हेंबरला दुर्बल घटक दिवस, बुधवार दि.२३ नोव्हेंबरला सांस्कृतिक एकता दिवस, गुरुवार दि.२४ नोव्हेंबरला महिला दिन आणि शुक्रवार दि.२५ नोव्हेंबरला जोपासना दिवस यानिमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे यांच्यासह संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने