रोजगार निर्मितीला चालना देणार्‍या शिंदे -फडणवीस सरकारचे अभिनंदन हे काम करणारे सरकार-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन

 रोजगार निर्मितीला चालना देणार्‍या शिंदे -फडणवीस सरकारचे अभिनंदन

हे काम करणारे सरकार-माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन
लातूर/प्रतिनिधी ः- वेगवेगळ्या क्षेत्रात 1 लाख 21 हजार रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारने  45 औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय घेणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे भारतीय जनता पार्टी अभिनंदन करीत आहे,  असे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आ. निलंगेकर   यांनी पत्रकात म्हटले आहे की, शिंदे - फडणवीस सरकारने राज्यातील युवक - युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यातील उद्योजक, औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे 1 लाख 21 हजार रोजगार निर्माण होतील. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात नवी गुंतवणूक येत नव्हती. आता शिंदे फडणवीस सरकारने कार्यक्षम सरकारचा अनुभव देत जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे.    
राज्यात भविष्यकाळात मोठी औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्रातील मोदी सरकारही महाराष्ट्रात नव्या प्रकल्पांसाठी सहकार्य करीत आहे. त्याचा परिणाम आगामी काळात दिसणार असून नव्या प्रकल्पांच्या माध्यमातूनही मोठी रोजगार निर्मिती होईल , असेही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर   यांनी पत्रकात म्हटले आहे.        
एसटी कामगारांचा महागाई भत्ता 34 टक्के करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही आ. निलंगेकर यांनी  शिंदे - फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने पैसे दिले नव्हते. पगार होत नसल्याने अनेक एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. शिंदे फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांनाही 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे , असेही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने