डिसेंबर महिन्यात सर्वस्तोमोतीरात्र महासोमयाग यज्ञाचे आयोजन
लातूर- वार्ताहर -लातूर शहरात 23 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत सर्वस्तोमोतीरात्र महासोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरु मंदिर तथा विश्व फाउंडेशन शिवपुरी, अक्कलकोट, श्री दत्त मंदिर देवस्थान महासोमयाग समिती लातूर हे या महासोमयाग यज्ञाचे आयोजक आहेत. बालाजी मंदिर येथे सहा दिवस हा यज्ञ होणार आहे.
चराचरसृष्टीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने यज्ञ संस्कृतीचा उदय व विकास झाला .सूर्याचे प्रतीक व देवतांचे मुख समजून अग्नीमध्ये हवन करणे व त्याची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ संस्था निर्माण झाली मात्र कालांतराने याला कर्मकांडाचे स्वरूप प्राप्त होऊ लागले .देशांतर्गत व पाश्चिमात्य देशात यज्ञ व अग्निहोत्र यावर अनेक वैज्ञानिक संशोधने व प्रयोग झाले आहेत ज्याचे निष्कर्ष अत्यंत आश्चर्यकारक आहेत त्यामुळेच जगभर अग्निहोत्र जीवन पद्धती ही आता रूढ होत आहे. महासोमयाग यज्ञ हा सामाजिक हेतूने व पर्यावरण शुद्धीसाठी केला जातो .दिनांक 23 ते 28 डिसेंबर या कालावधीत या होणाऱ्या यज्ञामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महासोमयाग समितीच्या वतीने करण्यात आले आहे
टिप्पणी पोस्ट करा