शिक्षक प्रतिनिधी सभा संघटनेच्या वतीने गटविकासाधिकारी युवराज म्हेञे यांचा सत्कार

शिक्षक प्रतिनिधी सभा संघटनेच्या वतीने गटविकासाधिकारी युवराज म्हेञे यांचा सत्कार

औसा - शिक्षक प्रतिनिधी सभा शाखा औसा संघटनेच्या वतीने नूतन गटविकासाधिकारी मा. युवराज म्हेञे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार यांनी केंद्र संमेलनातील शिक्षक बैठक व्यवस्था याविषयी समस्या मांडली. खुर्चीची व्यवस्था करण्याचे साहेबांनी आश्वासन दिले.गटविकासधिकारी शिक्षकातून आल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. शिक्षकांविषयीचा आदर त्यांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवत होता. स्वतःची मुलं त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकवली आहेत . नक्कीच शिक्षक प्रश्नाला न्याय मिळणार आहे. मराठवाडा सरचिटणीस दीपक चामे, जिल्हा सचिव सुरेश सुडे, औसा संघटक दयानंद वायदंडे, उमाकांत भोसले, कृष्णार्थ रत्ने, एस.डी.क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने