श्री संत सावता महाराज, महात्मा फुले, नारायण लोखंडे यांच्या उपस्थितीत माळी समाज मेळावा संपन्न

श्री संत सावता महाराज, महात्मा फुले, नारायण लोखंडे यांच्या उपस्थितीत  माळी समाज मेळावा संपन्न












निलंगा :- श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज रविकात महाराज वंसेकर यांच्या शुभ आशिर्वादाने महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने आयोजित माळी समाज मेळावा निलंगा येथे संपन्न झाला.माजी जज तथा महात्मा फुले ब्रिगेडचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदासजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले यांच्या नातसून निताताई होले, कामगार चळवळीचे जनक तथा सत्यशोधक मुंबई प्रांताचे पहीले अध्यक्ष रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतु गोपीनाथ वसंतराव लोखंडे, मार्गदर्शक प्रा डाॅ मेघराजजी पवळे, डाॅ भाऊराव यादव, प्रा नंदकुमार क्षिरसागर, महात्मा फुले ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय माळी, प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, युवक सरचिटणीस शाम गोरे,  प्रदेश उपाध्यक्ष नितीन म्हेत्रे,जिल्हाध्यक्ष नरहरी आण्णा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पवळे ,महिला जिल्हाध्यक्ष आरती माळी, शिक्षक जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा शृंगारे उपस्थित होते .मेळाव्याचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. रंजना क्षिरसागर, ऍड. नितीन म्हेत्रे यांनी तर आभार आयोजक युवक जिल्हाध्यक्ष सुनील वांजरवाडे यांनी मानले.मेळावा यशस्वी करण्यासाठी सुनील वांजरवाडे, जिल्हा उपाधक्षा कल्पनाताई आरसुडे, सचिन शेलार, नागमणी म्हेत्रे, दत्तात्रय म्हेत्रे, अमोल कोळकर, निळंकठ कोरके, कमल देशमुख, संतोष टाकेकर, शिवशंकर म्हेत्रे, नेताजी वांजरवाडे, अमोल म्हेत्रे, अजय म्हेत्रे, नारायण कोरके, योगेश दापके, खंडु झांबरे, महादेव पेठकर,मंदाकीनी कोरके,बबीता कोरके, छाया कोरके, नारायण कोरके, दिपाली पेठकर, रंजना टाकेकर, पल्लवी माळी, वांजरवाडे परिवार, महात्मा फुले ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.
    तत्पूर्वी संघटनेच्या वतीने संत सावता महाराज, तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व जयंती निमित्त टिपू सुलतान यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व महात्मा रॅली काडून अभिवादन करण्यात आले.
मेळाव्यात आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मदन वाघमारे, बबन राऊत, कृष्णा गोरे, अमृता वाघमारे, धनश्री गायकवाड,बाबूराव देशमुख,विठ्ठल चांभारगे,मोहन  नटवे,डॉ मिथून जाधव,तानाजी म्हेत्रे, शिवाजी शेळगे, ज्ञानदेव म्हेत्रे, संगिता शिंदे,सुधाकर खडके, कुंडलिक क्षीरसागर, सौ. पुनम पवळे, सिमा शिंदे, उर्वी यादव,चोपने वैजनाथ, रेणूका अदुडे, गोविंद पेठकर, ह.भ.प ज्ञानोबा महाराज (आष्टेकर),यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आशा साखरे, कविता गोरे, एकनाथ शिंदे, वैजनाथ कस्पटे, अभिमन्यू पवळे, बालाजी सरकाळे, साक्षी वडवळे, उषा भोजने,अमोल  म्हेत्रे, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने