निलंगा येथे भव्य माळी समाज मेळावा



निलंगा येथे भव्य माळी समाज मेळावा


लातूर -महात्मा फुले ब्रिगेड निलंगा तालुक्या च्या वतीने रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी वृंदावन मंगल कार्यालय, एम. आय. डी. सी, बँक कॉलनी रोड, निलंगा येथे माळी समाज मेळाव्या चे आयोजन करण्यात आले आहे.
    लातूर जिल्ह्यात होत असलेल्या या माळी समाज मेळाव्यास श्री संत सावता महाराज यांचे वंशज ह. भ. प. श्री रविकांत वसेकर महाराज, महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या नातसून निताताई होले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू गोपीनाथजी लोखंडे, महात्मा फुले ब्रिगेड चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी जज शिवदासजी महाजन प्रथमच आपल्या निलंगा शहरात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत महात्मा फुले ब्रिगेड चे मार्गदर्शक प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. भाऊरावजी यादव, मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराजजी पवळे, मार्गदर्शक प्रा. नंदकुमारजी क्षीरसागर, प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. अनुजी गायकवाड (पुणे) हेही आपणास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
    महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने  आयोजित केलेल्या या माळी समाज मेळाव्यात संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या लातूर जिल्ह्यातील आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या निमित्ताने आपल्या लातूर जिल्ह्यातील माळी समाज देशभरातील माळी समाज बांधवाशी जोडला जाणार आहे. आज पर्यंत महात्मा फुले ब्रिगेड च्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील गरजू विद्यार्थी,
यांना शिष्यवृत्ती, वयोवृद्ध व्यक्ती, दिव्यांग - कर्करोग ग्रस्त व्यक्ती , विधवा महिला यांना पेन्शन, गरजू व होतकरू व्यक्ती यांना व्यवसाय उभारणी व व्यवसाय वाढ करण्यासाठी बिनव्याजी कर्ज, विवाह साठी आर्थिक मदत, आजारपाणात आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे.
 या मेळाव्यात उपस्थित राहून नोंदणी करणाऱ्या विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती, निराधार, वयोवृद्ध व्यक्ती, रुग्ण, दिव्यांग यांना पेन्शन, तसेच या मेळाव्यात उपस्थित राहून नोंदणी करणाऱ्या विवाह करू इच्छिणाऱ्या वधू वर यांना प्रत्येकी 15000/- ₹ विवाह योजना निधी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वधू वर यांनी स्वतः नोंदणी फॉर्म भरून मेळाव्यात उपस्थित राहावे.वर्ष 2022 मध्ये अनेक अडचणीत असलेल्या समाजबांधव यांना आर्थिक सहकार्य करून महात्मा फुले ब्रिगेड ने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने जास्तीत जास्त समाज बांधव यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मदत करण्याचा  उद्देश आहे.
रविवारी होत असलेल्या या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व लहान थोर माळी समाज बांधव यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे (माळ),प्रदेश सरचिटणीस उत्तम जी गोरे, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा माळी, युवक प्रदेश सरचिटणीस शाम गोरे, प्रदेश उपाध्यक्ष ऍड .नितीन म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष सुनिल वांजरवाडे, नरहरी शिंदे, उपाध्यक्ष शिवाजी पवळे, कार्याध्यक्ष रंजना क्षिरसागर, सचिव आशा साखरे, सहसचिव देवराज गोरे, संघटक बालाजी सरकाळे,  संपर्क प्रमुख सचिन शेलार, जि.अध्यक्ष आरती माळी, जि.उपाध्यक्ष कल्पना आरसुडे, रंजना पोलकर, जि. अ. ज्ञानोबा शृंगारे, जि.अ.गोविंदराव क्षिरसागर, तालुका अध्यक्ष कविता गोरे, शहराध्यक्ष राम शिंदे, उपाध्यक्ष बाबुराव आरसुडे, मनीषा गोरे, अमोल राऊत,औसा ता.अ. एकनाथ शिँंदे,  उपाध्यक्ष उषा भोजने, वैजनाथ कस्पटे, सुषमा पवळे, ऋषिकेश म्हेत्रे, निर्गुणा शेलार, रंगराव क्षिरसागर,अनिता पवळे, राजाबाई पवळे, नारायण पवळे, सुशिला वंजे, अमोल कौळकर, नागमणी मेहत्रे, बबिता कोरके, निळकंठ कोरके, कमल देशमुख, दिपाली टाकेकर,मंदोदरी चांबरगे (माळी), साक्षी वडवळे, सतीश साळुंके, महादेव साळुंके, दिगंबर माळी, समर्थ गोरे, सार्थक भोजणे, संपन्न पवळे, सागर पवळे, सायली पवळे, श्वेता पवळे, संजना डोके व पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने