ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आप्पा परब यांच्या 'श्रीशिव युद्ध पंचअंग कोष ’ या पुस्तकाचे प्रकाशन



ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आप्पा परब यांच्या 'श्रीशिव युद्ध पंचअंग कोष ’ या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरताना आणि गडदुर्गांचा अभ्यास करताना इतिहासाच्या पाऊलखुणा शोधल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी इतिहास बोलत नाही तिथे भूगोल बोलतो आणि भूगोल ही जिथे कमी पडतो तेथे विज्ञान साक्ष देते. इतिहास भूगोल विज्ञान या तीन विषयांची सांगड घालून आपण शिवकाळातील अभ्यास केला पाहिजेअसे वक्तव्य ‘युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यावेळी लेखक आणि ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आप्पा परब यांनी केले.
दादर येथील मामा काणे हॉटेल हॉलमध्ये श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीदुर्गराज रायगड आणि दुर्गसृष्टी प्रतिष्ठानविक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ आप्पा परब यांच्या ‘युद्धपति श्रीशिव युद्ध पंचअंग कोष’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी पुढे ते असेही म्हणाले कीशेवटपर्यंत माणसाने विद्यार्थी राहायला हवे. आपण गडदुर्गांवरती फिरतो त्यावेळी शरीराने थकलो तरी मनाने कधीही थकू नयेकारण गडदुर्गांचा अभ्यास करणारी व्यक्ती कधी वृद्ध होत नाही. ज्यांनी रक्त सांडून इतिहास घडवला त्यांचा इतिहास सांगायलाबोलायला अथवा लिहायला मी काही घेणे योग्य नाही. त्यामुळे कोणालाही परवडेल एवढीच पुस्तकांची किंमत हवीअशी आग्रही भूमिका सुरुवातीपासून घेतली.
आप्पांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडाशी संबंधित दुर्गआरमारशस्त्रअश्व आणि युद्ध या पंचअंगाचा शब्दकोष यावेळी थोडक्यात उलगडून सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज केवळ जयजयकारापुरते न वापरता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास परीक्षेतील गुणांसाठी नाही तर जगण्यासाठी करणं आवश्यक असल्याचे त्यांनी उपस्थित रसिकधारकरी आणि शिवप्रेमींना पटवून सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक पश्चात स्वभाषेच्या रक्षणासाठी आणि वृद्धीसाठी राज्यव्यवहार कोष निर्माण केलात्यांना गुरू मानणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ उभी करून नवे शब्द मराठी भाषेला दिले आणि आता छत्रपतींनाच गुरू मानणाऱ्या आप्पांनी हा कोष निर्माण केला’असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी आप्पा परब यांच्या या व्रताला शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळ्यास श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड या संस्थेचे अध्यक्ष सुरेश पवारशिवप्रेमी राम धुरीनिसर्ग अभ्यासक बिभास आमोणकरशैल भ्रमर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वाळवेकरमुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरेराष्ट्रकूट मासिकाचे कार्यकारी संपादक राजन देसाईदुर्गसृष्टी प्रकाशनाचे प्रकाशक समीर वारेकरबी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे संचालक श्रीराम पाध्ये,  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि आप्पा परब यांचे कुटुंबीय उपस्थित होते. वय वर्षे ८४ असलेल्या आप्पा परब यांना यंदाचा चतुरंग संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार घोषित झाला असून तो याच महिन्यात भव्य कार्यक्रमात सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे.  यापूर्वी आप्पा परब यांची ३३ पुस्तके प्रकाशित झाली असून आगामी काळात निजामशाहीतील किल्लेपोर्तुगीज अंमलातील किल्लेमोंगल अंमलातील किल्लेआदिली अंमलातील किल्ले,  बहमनी अंमलातील  किल्लेकुतूबी  अंमलातील किल्लेआदिली अंमलातील किल्ले (शिवकाळ) ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने