महाराष्ट्र खो-खो संघाचा खेळाडू सनी नाईकवाडी याचा सत्कार


महाराष्ट्र खो-खो संघाचा खेळाडू सनी नाईकवाडी याचा सत्कार




उस्मानाबाद - भारतीय संविधान दिनानिमित्त शनिवार, 26 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सनी नाईकवाडी याचा मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सत्कारमूर्ती सनी नाईकवाडी याने स्पर्धेतील यशाचे श्रेय राज्य खो-खो महासंघाचे महासचिव डॉ. चंद्रजीत जाधव आणि प्रशिक्षक प्रवीण बागल यांना दिले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण बनसोडे, सचिव अ‍ॅड. सुदेश माळाळे, उपाध्यक्ष सुनील बनसोडे, प्रभाकर बनसोडे, सल्लागार श्रीकांत माळाळे, सहसचिव राजन माने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने