लक्ष्मी अर्बन बँक, अग्रवाल समाज व लायन्स क्लब लातूर यांचेकडून मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

लक्ष्मी अर्बन बँक, अग्रवाल समाज व लायन्स क्लब लातूर यांचेकडून मोतीबिंदू शिबिराचे आयोजन

लातूर: येथील लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि;लातूर या बँकेच्या रोप्य महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने तसेच अग्रवाल समाज लातूर,लायन्स क्लब लातूर व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अग्रेसन भवन, व्यंकटेश शाळेसमोर, झिंगनाप्पा गल्ली, लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात गरजू रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी उदयगिरी रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येईल. ज्या रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, त्यांची निवड केली जाईल व रुग्णालयाच्या गाडीतून उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येईल. सदरील शस्त्रक्रिया हि खूप महागडी आहे परंतु या शिबिराच्या माध्यमातून खूप अल्पदरात करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात रुग्णांना मोफत चष्मे व औषधे दिले जातील. शिबिरास येताना आधार कार्ड, रेशन कार्ड घेवून येणे बंधनकारक आहे. या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील जास्तीत जास्त गोरगरीब,शेतकरी व गरजू लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हाईस चेअरमन सूर्यप्रकाश धूत, उदयगिरी नेत्र रुग्णालयाचे संचालक ला.डॉ. रामप्रसाद लखोटिया, अग्रवाल समाज ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, लायन्स क्लब लातूरचे अध्यक्ष पी.व्ही.विवेकानंद, सचिव अशोक पांचाळ,ला. जयराम भुतडा, बँकेचे प्र.सीईओ अविनाश आळंदकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बँकेचे अधिकारी सुशिल जोशी मो. ७७७००१४९२१ यावर संपर्क साधावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने