माधव शेटकार यांना पीएच.डी. मिळाल्याने संस्थाध्यक्ष पाटिल यांच्या हस्ते सत्कार


निलंगा(प्रतिनिधी) : महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी येथील कार्यरत असलेले प्रा. माधव अरविंद शेटकार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (नांदेड) फार्मसी शाखेत नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.प्रा. माधव अरविंद शेटकार यांनी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "फार्मोलिशन अँड इव्होल्युशन ऑफ नॅनो पर्टिक्युलेट टॉपिकल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम कंटेनिंग नॉनस्टरायडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग'" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. याबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष  विजयकुमार पाटील निलंगेकर यांनी प्रा. माधव अरविंद शेटकार यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस.एस. पाटील , महाराष्ट्र पॉलिटेक्निक (डी. फार्म) इन्स्टिट्यूट प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ, सर्व प्राध्यापकासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने