लातूर कॉलेज ऑफ फार्मसी मतदार नोंदणी शिबिर
औसा प्रतिनिधी -श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लातूर उप जिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे व नायब तहसीलदार लातूर निवडणूक विभाग कुलदीप देशमुख, महसूल सहाय्यक अधिकारी निवडणूक विभाग संजय गबाळे यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच सोबत संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे , सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे ,प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला ,प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम, संचालक नंदकिशोर बावगे हे उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार डॉ.सुचिता शिंदे यांचा सत्कार शाल ,श्रीफळ व बुके देऊन प्रा. माधुरी पोलकर यांनी केले.कुलदीप देशमुख यांचा सत्कार संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी केले, संजय गबाळे यांचा सत्कार कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी केले राजेंद्र किसवे यांचा सत्कार श्रीनिवास बुमरेला यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्ताविक प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला याने केली "भारतीय राज्यघटनेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे त्यासाठी प्रथम मतदार यादी मध्ये नाव नोंदविले पाहिजे" असे आपल्या मनोगत व्यक्त केले.त्यानंतर नायब तहसीलदार निवडणूक विभाग लातूर कुलदीप देशमुख यांनी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान यादी मध्ये वॉटर हेल्पलाइन या ॲपच्या माध्यमातून नोंद कशी करता येईल हे प्रात्यक्षिक दाखवून दिले त्यानंतर उपजिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना "लोकशाहीमध्ये आणि भारतीय राज्यघटने प्रमाणे प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता याला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने मतदार यादी मध्ये नाव असलं पाहिजे आणि हे नाव आपण प्रत्येकाने नोंद करून घ्यायला पाहिजे असे सांगितले" .
तसेच प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते इलेक्ट्रॉल लिटरसी क्लबचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी ऑपरेटर
पंकज मुळे, पुरवणी निरीक्षकगणेश अंबर, पी.एल .ओ.
राजेंद्र किसवे, पत्रकार महादेव डोंबे व महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा