अर्थशास्त्र अभ्यासमंडळ निवडणूकित डाॅ. बालाजी घुटे विजयी


लातूर : दयानंद कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमूख डाॅ. बालाजी घुटे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीत विजयी झाले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डाॅ. प्रशांत मान्नीकर, कार्यालयीन अधिक्षक रुपचंद कुरे, डाॅ. सुनील साळुंके, डाॅ. सुनिता सांगोले, डॉ संतोष पाटील, डॉ नितीन डोके, डॉ, मछिंद्र खंडागळे, डॉ सुभाष कदम, प्रा राजकुमार मोरे आदींची उपिस्थती होती. अभ्यासू आणि विद्यार्थीप्रीय प्राध्यापक म्हणून डाॅ. घुटे यांची ओळख आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमधील प्राध्यापकांचे मतदान होऊन ते विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललित शाह, रमेश राठी यांच्यासह सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने