सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यानेच संस्थेचा विकास होतो-वेताळेश्वर बावगे

सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यानेच संस्थेचा विकास  होतो-वेताळेश्वर बावगे 
                                         



औसा (प्रतिनिधी):दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल स्वीकारले पाहिजे, ते काळाची गरज असून त्याकरिता संस्थेतील शिक्षक,प्राध्यापक व कर्मचारीवृध्दांची एकत्रितपणे काम आवश्यक आहे.संस्थेच्या प्रगतीतच तुमची प्रगती दडलेली असून चहेरे जरी आमची असली तर मेहनत मात्र तुमची असल्याचे प्रतिपादन वेताळेश्वर बावगे यांनी केले.श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेस आणखीन दोन पदवी अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यानंतर ते कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, यांच्यासह सर्व विभागाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारीवृद्ध उपस्थित होते.या संस्थेस लातूर कॉलेज ऑफ बी.फार्मसी प्रॅक्टिस हासेगाव हे मराठवाड्यातील पहिले  महाविद्यालय आहे. व लातूर कॉलेज ऑफ बी फार्मसी,कातपूर रोड , लातूर असा दोन पदवी अभ्यासक्रमास मान्यता मिळाली.पुढे बोलताना बावगे म्हणाले,जो पर्यंत श्वास आहे,तो पर्यंत संस्थेचा विकास करत राहू,भविष्यात हे शिक्षण युनिट अग्रगण्य संस्थेत अग्रेसर राहुन उत्कृष्ट शिक्षण देईल.या यशात तुमचे योगदान अनिवार्य असून या श्रेयाचे वाटेकरी तुम्ही आहात,असे शेवटी त्यांनी सांगितले.    
   श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ बी फार्मसी (प्रॅक्टिस ) या नवीन कोर्स ला मान्यता मिळाली . फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया दिल्ली व तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी  मान्यता दिली आहे .  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड अंतर्गत हा चालणारा कोर्स आहे. डी फार्मसी पूर्ण होऊन  कमीत कमी  चार वर्ष झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जेने  करून जे  जॉब वरती आहेत किंवा काही कारणास्तव त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाहीत अशा विध्यार्थ्यांसाठी हा  कोर्स आहे . अशी माहिती कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी दिली .नवीन कोर्स मिळाल्या बद्दल संस्था कर्मचारी मुख्याध्यापक गोरे कालीदास,कुटवाड जी. व्ही , पाटील डी.एस.  यांनी संस्था अध्यक्षांचे शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.त्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  संचालक नंदकिशोर बावगे , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी यांनी  येथील प्राचार्य आणि प्राद्यापक वर्गाचे  अभिनंदन करून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकिशोर बावगे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने