कोपेश्वर मंदीर-खिद्रापूर

कोपेश्वर मंदीर-खिद्रापूर 




कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात खिद्रापूर येथे हे मंदीर आहे.वास्तू कलेचा अप्रतिम अविस्मरणीय नमुना आपल्याला पाहायला मिळतो. नृसिंह वाडी पासून 25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.हे मंदीर 12 व्या शतकातील चालुक्य  काळातील आहे. 128 भक्कम दगडी खांब हे या मंदिराचे वैशिष्ट्ये आहे. मंदिर तीन भागात विभागलेले आहे. गर्भ गृह, सभा मंडप आणि  यज्ञ मंडप यालाच स्वर्ग मंडप असेही नाव आहे.गाभार्‍यात म्हणजेच गर्भ गृहात कोपेश्वर आणि धोपेश्वर असे दोन साळुंका असलेले लिंग आहे.नंदी नसलेले हे एकमेव मंदीर आहे.गर्भ गृहात एक लिंग आहे.दूसरे विष्णु लिंग आहे.यास कोपेश्वर लिंग असे नाव आहे.पुरातन आख्यायिका नुसार सतीने  दक्ष  यज्ञात जेंव्हा उडी मारली तेंव्हा महादेव वीरभद्रा वर युद्ध सोपवून रागा रागाने या ठिकाणी आले आणि त्यांची समजूत काढण्यासाठी विष्णु येथे आले होते अशी पुरातन कथा आहे.कोपलेले महादेव म्हणून या लिंगास कोपेश्वर शिवलिंग असे म्हणतात.नंदी नसलेले हे एकमेव मंदिर आहे. याचे कारण महादेव दक्षावर कोपून रागारागाने आले तेंव्हा नंदी देखील युद्धात मग्न होते.महादेव एकटेच आले होते.अशी अख्यायिका आहे.या मंदिराची रचना हेमाडपंती असून सर्व दगडी काम आहे. 128 दगडी खांब आहेत.32 खांबाचा सभा मंडप आहे. येथे नंदीची मूर्ती असेल असे सांगितले जाते.येथे दोन बाजूला दोन दरवाजे आहेत.




 48 खांबाचा यज्ञ मंडप मंदिरात प्रवेश केल्या बरोबर दिसतो.याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मंडप वरच्या बाजूने गोलाकार असून open खुल्ला आहे. होम हवन केल्यास त्यातून धूर बाहेर पडण्यासाठी तो खुल्ला आहे असे म्हटले जाते. अतिशय गोलाकार 14 फुट व्यास असलेला  हा खुल्ला मंडप आहे. यास स्वर्ग मंडप असे नाव आहे. हा 48 खांबाचा बनलेला आहे.मध्यभागी 14 फुट  व्यासाची गोलाकार रंग शिळा आहे. आणि वरती बरोबर तेवढ्याच 14 फुट व्यासाचा गोलाकार गवाक्ष आहे.वर्षातून एकदा त्याच्या मधोमध चंद्र दिसतो.हे दृश्य अतिशय विलोभनीय असते.यात प्रथम 12 खांब वर्तुळाकार आहेत. त्या नंतर 16 खांब आहेत पुन्हा कठड्यावर 12 खांब आहेत आणि शेवटी दरवाज्याच्या बाजूला 2 असे 8 खांब आहेत. असे एकूण 48 खांब आहेत. आतील 12 खांबावर देवतांच्या मूर्त्या आहेत.सुरुवातीला जे खांब आहेत त्यावर यम इंद्र वरुण कार्तिक स्वामी विष्णु आणि ईशान्य म्हणजे महादेव आहेत इंद्राची मूर्ती भग्न झालेली आहे. नवगृहाच्या देखील मूर्त्या कोरलेल्या आहेत.मंदिराच्या बाहेरील भाग तीन विभागांत विभागलेला आहे.एक गजपट्टा त्या वर 92 हत्ती कोरलेले आहेत.त्या नंतर नरपट्टा आहे तेथे विविध देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. नृत्य  आणि वाद्ये  वाजविताना अप्सरा कोरलेल्या आहेत. व्याल म्हणजे काल्पनिक प्राणी,मत्स्य कन्या रामायणातील कांही प्रसंग कोरलेले आहेत.सर्वात वरचा पट्टा तेथे देखील देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत.या मंदिरात 12 शिलालेख आहेत असे हे अप्रतिम दगडी मंदीर वास्तू कलेचा अविस्मरणीय नमुना असून संपूर्ण दगडी काम आहे.

निर्मला केशव शिंदे पाटील
सेवानिवृत्त उप प्राचार्या
लेखिका कवयित्री

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने