शिवाजी वडगावे (माळी) वाढदिवसानिमित्‍त श्री विरभद्रेश्‍वर प्रशालेत शालेय साहित्‍याचे वाटप

 शिवाजी वडगावे (माळी) वाढदिवसानिमित्‍त श्री विरभद्रेश्‍वर प्रशालेत शालेय साहित्‍याचे वाटप








 औसा प्रतिनिधी -शिवाजीराव वडगावे (माळी) यांच्‍या 84 व्‍या वाढदिवसानिमित्‍त आज  दिनांक  03/12/2022 वार शनीवार रोजी श्री विरभद्रेश्‍वर प्रशाला औसा येथील 384 विद्यार्थ्‍यानां सपत्‍नीक सौ. वत्‍सला वडगावे, राजेंद्र वडगावे,अनिता वडगावे ,अंकिता वडगावे व वैभव वडगावे यांच्‍या हस्‍ते शालेय साहित्‍य वाटप करण्‍यात आले. त्‍यांनी इतरत्र कोठेही आपला वाढदिवस साजरा न करता त्‍यांचा वाढदिवस एकदम साध्‍या पध्‍दतीने शालेय विद्यार्थ्‍यासोबत विद्येच्‍या मंदीरात शालेय साहित्‍य वाटप करुन साजरा केला.
यावेळी सुत्रसंचालन सदाशिव कांबळे सर व प्रास्‍ताविक बी.एम.माळी सर यांनी केले. मुख्‍याध्‍यापक शिवकुमार मुरगे सर यांनी वडगावे परिवारानी कुठल्‍याही विद्यार्थ्‍याची आवडानिवड न करता सर्व विद्यार्थ्‍याना शालेय साहित्‍य वाटप केल्‍याबद्दल वडगावे परिवाराचे आभार मानले. या कार्यक्रमास चंद्रशेखर हलमडगे, शिवाजी वैद्य, श्रीमती शोभा सिध्‍दपवार , श्रीमती प्रिती कांबळे, श्रीमती सुरेखा मुंजाने, श्रीमती अनुराधा लोहारे, दिंगबर शालगर आदी मान्‍यवर उपस्‍थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने