औसा (प्रतिनिधी )- हासेगाववाडी येथील तीर्थक्षेत्र टेंबी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेत पैलवान तुकाराम महानोर विजेता तर अंकुली येथील गौरव मुळे उपविजेता ठरले . या यात्रेत मोठ्या उत्सहाने दहा हजारावून जास्ती लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कुस्ती सामन्यांनंतर बक्षीस वितरण करण्यात आले. तीर्थक्षेत्र टेंबी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कुस्ती सामन्यातील पारितोषिक रोख रक्कम ७००० रुपयांचा धनादेश श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे यांच्याकडून देण्यात आला . विजेता पैलवान तुकाराम महानोर आणि कुस्ती सामना उपविजेता गौरव मुळे हे होते. अशी माहिती संस्थेचे संचालक आत्माराम मुलगे यांनी दिली . या बक्षीस वितरण प्रसंगी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , संस्थेचे संचालक आत्माराम मुलगे, हासेगाव उपसरपंच सलीम शेख, हासेगाववाडीचे सरपंच बाजीनाथ सरवदे ,निळकंठ पाटील ,पांडुरंग चेवले ,भाऊसाहेब लवटे ,अनिल शेंडगे , लवटे , शेषेराव महानवर ,अजय साठे ,सुभान लवठे, काका रुपणावर, जीवन कांबळे, दादाराव सुरवसे ,बापू मदने, दत्ता लवटे आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टेंभीच्या कुस्ती स्पर्धेत पैलवान महानोर ठरला विजेता
www.swaranpushp.com
0
टिप्पणी पोस्ट करा