लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा





लातूर :-लातूर परिसरातील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  

या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर संस्था संचालक युवराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटीचे

चेअरमन रविशंकर मुंढे, परमेश्वर कुमदाळे, गुणवंत सोनटक्के, दीपक करमले, शान्तेश्वर उटगे, नागिनी उटगे,

सोनाली मोदी, प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख, रुपाली कोकाटे, नम्रता झाम्बरे, रुपाली कुलकर्णी,

पूजा शिंदे, प्रियांका नागलबोने, भाग्यश्री चीपडे, सोनाली शहाणे, सोनाली राऊत, मकरंद सबनीस,

दीपककुमार कांबळे, मनेष येवतीकर, अतिष झाड्के, सुशील गोसावी, गणेश इरकर, विद्या कदम, यांची

उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेने स्पीच कॉम्पीटीशनचे आयोजन केले होते. यावेळी प्रथम, द्वितीय आणि

तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अशाप्रकारचे उपक्रम शाळेतर्फे नेहमीच घेतले

जातात.

यावेळी शाळेच्या शिक्षिका रुपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने