पंकज काटे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० गरजू महिलांना साडी - चोळीचे वाटप

 पंकज काटे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० गरजू महिलांना साडी - चोळीचे वाटप




 लातूर - युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ काटे यांचा वाढदिवस लातूरसह मराठवाड्यात उत्साहपूर्ण वातावरणात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त येथील शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचारी व कुष्ठधाममधील २०० महिलांना साडी - चोळीचे वाटप करण्यात आले.
  युवा भीम सेनेचे संस्थापक पंकजभाऊ काटे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरासह, मुरूड, ढोकी, औसा, बोरगाव, तांदुळजा, कळंब आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महिलांना साडी - चोळीचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे सारोळा रस्त्यावरील कुष्ठधाम येथील कुष्ठ रुग्ण महिलांनाही साडी - चोळीचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांना फळ वाटपही करण्यात आले.
  या कार्यक्रमास पंकजभाऊ काटे यांच्यासह युवा भीम सेनेचे उपाध्यक्ष महेबूब शेख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सांगळे, डॉ. रवी उदगीरकर, डॉ. उत्कर्ष गुळवे, शासकीय रक्तपेढीचे संजय कांबळे, बापू दुधारे, शरद कांबळे यांच्यासह युवा भीम सेना विद्यार्थी आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अमोल जाकते, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ गवळी, संघटनेचे संघटक कुमार कांबळे, महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा उषा धावारे, जिल्हाध्यक्षा उमा आदमाने, कुमार कांबळे, धीरज लांडगे, अजय कांबळे, शेखर कांबळे, सोमनाथ गवळी, बालाजी कांबळे यांची उपस्थिती होती.
 वाढदिवसानिमित्त पंकजभाऊ काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लातूर व मुरूड येथील निवासस्थानी संघटनेच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांसह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने