आभाळ पाहिजे म्हणत्यात,अन् बियाणं मातीतच टोपत्यात,या शहाण्या बाया- आबा पाटील

आभाळ पाहिजे म्हणत्यात,अन् बियाणं मातीतच टोपत्यात,या शहाण्या बाया- आबा पाटील

लातूर प्रतिनिधी -गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्रीचे)वाणिज्य महाविद्यालयच्या दशकपूर्ती महोत्सव, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व साहित्याक्षर प्रकाशन, नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
'कवी नव्हे तर कविता मोठी झाली पाहिजे'
या उपक्रमा अंतर्गत प्रसिद्ध कवी आबासाहेब पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण मॅडम, सूत्र संवादक: डॉ. संजय बोरूडे सर , 
समन्वयक: प्रा. नयन भादुले-राजमाने, 
प्रमुख उपस्थिती:डॉ.रचना मॅडम यांची होती.
प्रसिद्ध कवी आबासाहेब पाटील यांनी दुष्काळाच्या,सामाजिक भान असणाऱ्या, निवडणूक आणि राजकारण यांच्यामुळे सामान्य जनतेची होणारे फरपट चित्रित करणारी कविता श्रोत्यांना ऐकवली.समाजप्रबोधन, मनोरंजन, या बरोबरच प्रेम कविता ही सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांची गाजलेली कविता ' या शहाण्या बाया ' सर्वाच्या काळजाचा ठाव घेतला .कवितांच्या सादरीकरणानंतर प्रश्नोत्तराचे सत्र जोरदार रंगले. श्रोत्यांच्या प्रश्नांना आबा पाटील यांनी समर्पक उत्तरे दिली. आपल्या जीवनातील घटना, प्रसंग सुख-दुःख, चांगले- वाईट यांचा मेळ घालत श्रोत्यांशी संवाद साधला. एकाच कवीच्या सलग दोन तास कविता ऐकणे व त्यावर प्रश्न विचारणे ही कल्पनाच मुळात अफलातून आहे. ही संकल्पना घेऊन साहित्याक्षरने केलेला हा चौथा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्यादेवी कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय साहित्यिक, प्रा. नयन भादुले- राजमाने यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. कल्पना झांबरे यांनी केले. प्रा. आरेफ शेख सर यांनी आभार व्यक्त केले. 
                    दुसऱ्या सत्रात कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी योगीराज माने, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी रमेश चिल्ले सर होते. पहिल्या सत्राला उपस्थित असणाऱ्या कवींच्या कवितांचा जागर या सत्रात चांगलाच रंगला. वैविध्यपूर्ण आशय, विषय, प्रकार यांच्या माध्यमातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.डॉ.दुष्यंत कटारे, रामदास कांबळे, नरसिंग इंगळे,डॉ.संजय जमदाडे, प्रा. गोविंद जाधव,प्रा.विश्वंभर इंगोले,सुजाता भोजने,प्रा. सुलक्षणा सरवदे, उषा भोसले,मोहन राठोड, शिवकन्या साळुंके, प्रा. कल्याण राऊत , ऋचा पत्की ,मंगला सासस्तूरकर, प्रकाश घादगिने, राजकुमार दाभाडे, सुलोचना मुळे, विजया भणगे, सुनीता मोरे, विशाल अंधारे यांनी कविता सादर केली .कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे व डॉ. रचना मॅडम यांनी बहारदार केले.  सूत्रसंचालन प्रा अनिता चौधरी यांनी केले. आभार डॉ. सचिन प्रयाग यांनी मानले या कार्यक्रमासाठी  कवी, कवयित्री, रसिक श्रोते, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
अशा पद्धतीचा कार्यक्रम अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने